श्री मंगळग्रह मंदिरातील यंत्र आणि टाकांना मोठी मागणी

  • Home
  • Uncategorized
  • श्री मंगळग्रह मंदिरातील यंत्र आणि टाकांना मोठी मागणी
मंगळग्रह देव हा पराक्रम आणि धैर्याचा कारक मानला जातो. ज्योतीष व धर्मशास्त्रात मंगळग्रहाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे या ग्रहाची कृपादृष्टी राहावी, यासाठी मोठ्या श्रद्धेने भाविक श्री मंगळग्रह मंदिरात येतात. अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात मंगळदोष निवारणासाठी भाविकांकडून पूजा-अभिषेक केले जातात. या मंदिरात उपलब्ध असलेला मंगळाचे प्रतीक म्हणून टाक व यंत्र यांना भाविकांकडून मोठ्या प्रमाणात श्रद्धापूर्वक मागणी असते.
यांनी बनवला टाक
गेल्या तीन पिढ्यांपासून टाक बनविण्याची कला अवगत असलेले पारोळा (जिल्हा-जळगाव)येथील शरद सोनवणे यांनी आजवर श्री तुळजाभवानी, श्री महालक्ष्मी, तिरुपती बालाजी शिर्डीचे साईबाबा, श्री गणपती आदी विविध देव-देवतांचे टाक तयार केले आहेत. याच सोनवणे कुटुंबीयांनी श्री मंगळग्रह देवाचा टाक तयार केला आहे.
काय आहे महत्त्व
हे यंत्र मंगळग्रहाचे प्रतीक मानले जाते. मंगळाला तांबे प्रिय असल्याने हे यंत्र याच धातूपासून तयार केले आहे. मंगळग्रह देवाच्या साक्षीने मंदिरात विधिवत पूजा करून यंत्र घरात, देवघरात ,तिजोरीत अथवा दुकानात ठेवल्यास हिंमत, ध्येय, ऊर्जा, आरोग्य, धनसंपदा टिकून राहते अशी मान्यता तथा भाविकांची श्रद्धा आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *