श्री मंगळग्रह मंदिरातील कमळकंदांचे भाविकांना आकर्षण

  • Home
  • Uncategorized
  • श्री मंगळग्रह मंदिरातील कमळकंदांचे भाविकांना आकर्षण
फुले हे नेहमी सर्वांना आकर्षित करीत असतात त्यांचा विविध रंग, गंध यामुळे वातावरण नेहमी प्रसन्न राहत असते. अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर येथे कमळकंद या फुलांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली असून येथे येणाऱ्या भाविकांचे ही फुले नेहमी लक्ष वेधून घेत असतात.
कमळ हे फुल सर्वात लोकप्रिय फुलांपैकी एक आहे, हे राष्ट्रीय फूल असून याला मोठ्या प्रमाणावर मागणी देखील आहे. प्राचीन काळापासून हे फुल देवी लक्ष्मीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. कमळाचे सर्व भाग खाण्यायोग्य असून त्यांचा आयुर्वेदिक औषधे बनविण्यासाठी देखील वापर होत असतो. कमळाच्या फुलांच्या प्रत्येक भागामध्ये औषधी गुणधर्म असतात. विविध आजारांपासून तुमचे रक्षण देखील होत असते. तसेच याच्या पानांचे देखील अनेक फायदे आहेत. तर रक्ताभिसरण नियमित करण्यासाठी देखील याचा उपयोग होतो.
हिंदू पौराणिक कथांमध्ये धनाची देवी लक्ष्मी कमळाच्या फुलावर वास करते. हे मानसीक आणि भावनिक शुद्धता देखील दर्शविते. धार्मिक कारणांसाठी फुलांचा वापर होत असतो. याची उत्पत्ती भगवान विष्णूच्या नाभीतून झाली असे मानले जाते. श्री मंगळ ग्रह मंदिर येथे विविध रंगाची कमळकंदाची फुले लावण्यात आली. यात पिवळ्या, पांढऱ्या, निळ्या, गुलाबी,भगव्या रंगाची फुले येणाऱ्या भाविकांची लक्ष वेधून घेत असतात. येथील कमळकंद हे भाविकांना वाजवी दरात देखील उपलब्ध करून देण्यात येते. त्याची कशा पद्धतीने लागवड करावी याची देखील संपूर्ण माहिती येथील सेवेकरी भाविकांना देत असतात. उमललेली फुले आठ ते दहा दिवस फुललेली असतात. या फुलांचा पूजेसाठी वापर होत असतो. कमळ हे शक्ती, पुनर्जन्म, आणि शुद्धतेचे प्रतीक म्हणून पूज्य आहे. घाणीतून निष्कलंक कमळ निघतात ही वस्तुस्थिती त्यांना शुद्धतेचे लोकप्रिय प्रतिनिधित्व करते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *