श्री मंगळग्रह मंदिरातर्फे भाविकांसाठी ऑनलाईन अभिषेक बुकिंगची सुविधा.

  • Home
  • Uncategorized
  • श्री मंगळग्रह मंदिरातर्फे भाविकांसाठी ऑनलाईन अभिषेक बुकिंगची सुविधा.

अमळनेर येथील मंगळग्रह मंदिर हे अतिप्राचीन, अतिदुर्मिळ आणि अतिजागृत देवस्थानांपैकी एक मंदिर आहे. महाराष्ट्रासह, भारतभरातील भाविक आपल्या श्रद्धेमुळे येथे दर्शन व अभिषेकासाठी येत असतात. भाविकांच्या सोयीसाठी मंदिरातर्फे आता ऑनलाईन अभिषेक बुकिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
भाविकांना अभिषेकासाठी व मंगळग्रह मंदिरावर यायचे असेल तर घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने अभिषेक बुकिंग करता येणे सहज शक्य झाले आहे. ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी गुगल वर जाऊन www.mangalgrahamandir.com या मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावर अभिषेक बुकिंग या बटनावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला तात्काळ पावती देखील मिळेल. सदर पावती मंदिरातील ऑनलाईन बुकिंग काउंटरवर दाखविल्यास तात्काळ अभिषेक बुकिंग स्वीकारली जाणार आहेत. यामुळे दूरवरून येणाऱ्या भाविकांना अत्यंत सोप्या पद्धतीने अभिषेक पावती मिळविणे सोपे झाले आहे. मंगळग्रह मंदिरात दर मंगळवारी अभिषेकासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने येथे आल्यानंतर आता भाविकांना रांगेत उभे राहून अभिषेक पावती काढण्याची आवश्यकता नाही जे भाविक लांब पल्ल्यावरून येत असतील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अभिषेक बुकिंग करून अभिषेक करावेत असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्था तर्फे करण्यात आले आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *