मंगळ ग्रह मंदिराची माहिती संकेतस्थळ मिळाल्याने रशियन महिलेने गुरुवारी श्री मंगळग्रह मंदिरास सदिच्छा भेट दिली.
भाविकांचे श्रद्धास्थान मंगळ देवाच्या दर्शनासाठी भारतासह विदेशातील भाविक मोठया संख्येने येत असतात. रशियन उद्योजिका देशा यांनी काही महिन्यांपूर्वी मंगळग्रह देवतेची माहिती घेतली होती. त्यांनी भारतात आल्यानंतर मुंबईतील मित्रांशी चर्चा केल्यानंतर जळगाव येथे जात असताना अमळनेर येथे येऊन श्री मंंगळग्रह मंदिरास भेट दिली. यावेळी सहलीनिमित मंदिरात आलेल्या मुलांनी देशा यांच्यासोबत सेल्फी घेतला.