येथील मंगळग्रह मंदिर हे विश्वातील एकमेव मंदिर असून येथे दर मंगळवारी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात. प्रवास दरम्यान येणार थकवा व आरोग्याचा विचार करत भाविकांसाठी मंदिरात बॉडी मसाज चेअरची सेवा दिली जात आहे. मंगळग्रह सेवा संस्थतर्फे मंदिरात नेहमी विविध उपक्रम राबविले जात असतात. भाविकांना कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जाते. दर मंगळवारी मंदिरावर येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असल्याने बॉडी मसाजची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधेचा भाविक मोठ्या संख्येने लाभ घेत असतात. मसाज केल्यानंतर भाविकांना आरामदायी अनुभव येत असल्याचे म्हणणे आहे. ही सुविधा अत्यंत अल्पदरात उपलब्ध असल्याने सर्वांना सहज परवडणारी आहे.