अमळनेर (जि.जळगाव महाराष्ट्र)- हवन किंवा यज्ञाला हिंदू संस्कृतीत अनादी अनंत काळापासून अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. हा विधी शुद्धीकरणाचा आहे. येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित मंगळग्रह मंदिर येथे, मंगळ देवाचे दर्शन व अभिषेकाने भाविकांच्या इच्छापूर्ती झाल्याची अनुभूती अनेकांना आल्याने श्रद्धास्थान ठरले आहे.
विविध पूजा अभिषेकांमुळे इच्छापूर्ती होत असल्याची भावना भाविकांतून व्यक्त केली जात आहे यामुळे मंगळग्रह मंदिर दर्शन व पूजा अभिषेकासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. विविध प्रकारच्या शांतीसह हवानात्मक शांती विधिवत पद्धतीने करण्यात येत असते. याचा भाविकांना मोठा फायदा होत असून प्रचिती देखील येत आहे.
हवानात्मक शांती विधीमध्ये हवन कुंडात अग्नीद्वारे मंगळ देवाची पूजा केली जाते. यज्ञ समिधा व हवानात्मक सामग्रींची आहुती दिली जाते. आपल्या आयुष्यातील दुःख,कष्ट, संकटे किंवा प्रलंबित प्रश्न आदींच्या निर्मूलनासाठी व भरभराटीसाठी मंगळ देवाची हवनात्मक पूजा शांती केली जाते. हवनात्मक शांती पूजा पाच चौरंग मांडून त्यात गणपती पुण्याहवाचन मातृका पूजन,मंगळाचे पूजन, नवग्रह मंडलाचे पूजन, रुद्र कलश पूजन तसेच हवन केला जातो. होम हवनात्मक पूजेसाठी इच्छुक भाविकांना मंदिरातील पुरोहितांच्या मार्गदर्शनाने अभिषेक पूजेची शांतीची माहिती दिली जाते. हवनात्मक शांतीसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक मंगळग्रह मंदिरात उपस्थिती राहून शांती करीत असतात. यामुळे भाविकांना आरोग्य,धैर्य, साहस, पराक्रम, काम, क्रोध या गोष्टींवर नियंत्रण मिळविणे शक्य होत असते, अशी व्यापक मान्यता व श्रद्धा आहे.