तीन वर्षापासून नियमित शिबिराचे आयोजन
मंगळग्रह मंदिरात धार्मिक कार्यासोबतच भाविकांच्या आरोग्याची काळजी ही घेतली जाते. त्या अनुषंगाने गेल्या तीन वर्षापासून मंगळग्रह सेवा संस्था व जळगाव येथील केशवस्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भाविकांची मोफत रक्तगट तपासणी, वजन, हिमोग्लोबिन तपासणी केली जाते.
मंगळग्रह मंदिरात अंगारकी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर अनेक भाविकांनी रक्ततपासणी व रक्तदान केले. यामध्ये महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यातील भाविकांचा सहभाग दिसून आला. केशव स्मृती प्रतिष्ठान जळगाव अंतर्गत मांगीलाल बाफना रक्तपेढीचे डॉ.मकरंद वैद, डॉ.सुनिल पाटील, रामचंद्र पोतदार, गिरीश खोडे, उदय सोनवणे, आदीनी रक्तगट तपासणीसाठी व रक्तदान करणाऱ्यांना भाविकांना सहकार्य केले.