देशासह विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंगळ ग्रह मंदिरात रविवारी ऑस्ट्रेलिया येथील सिडनी शहरातील महिला वैद्यकीय डॉक्टर (फिजिओथेरपी) आदिती चौधरी यांनी मंगळ देवतेचा अभिषेक केला. डॉ. आदित्य चौधरी या जळगाव जिल्ह्यातील आमोदे येथील मूळ रहिवासी आहेत. त्या मांगलिक असल्याने हा अभिषेक करून घेतला. याप्रसंगी डॉ. आदित्य यांचे मामा प्रा.आशिष भोळे, माधवी भोळे, नितीन भंगाळे आदी उपस्थित होते. मंदिर परिसरातील वातावरण व अभिषेक केल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले.