मंगळग्रह सेवा संस्था तर्फे येथील मंगळग्रह मंदिर परिसरात भोंग्यासाठी असलेल्या जागेचे भूमिपूजन वेस्टइंडीज येथील भारतीय राजदूत डॉ.के.जे.श्रीनिवासा यांच्या हस्ते सोमवार दि.१६ जानेवारी रोजी करण्यात आले.
भोंग्यासाठी असलेल्या जागेचे विधिवत पूजन करून मंत्रोच्चाराच्या गजरात भारतीय राजदूत डॉ.के.जे. श्रीनिवासा यांच्या हस्ते श्रीफळ वाहून भूमिपूजन करण्यात आले. मंदिरात असलेल्या भोंग्याचे स्थलांतर लवकरच नवीन जागेत करण्यात येणार आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, माजी आमदार स्मिताताई वाघ, पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, हरिभाऊ वाणी, योगेश मुंदडा, प्रदीप अग्रवाल, अभियंता संजय पाटील, श्याम गोकलानी, विनोद अग्रवाल, पंकज मुंदडा, आशिष चौधरी, विशाल शर्मा, मंगळग्रह संस्थेचे उपाध्यक्ष एस.एन.पाटील सचिव एस.बी.बाविस्कर सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, औरंगाबाद येथील एस्ट्रोलॉजिस्ट संजयसिंग चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.