मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर हे सैनिकांचे श्रद्धास्थान ठरले आहे. येथे मोठ्या प्रमाणावर आजी- माजी सैनिक श्री मंगळग्रह देवाच्या दर्शनासाठी येतात. श्री मंगळग्रह देव साक्षात युद्धदेवता असल्याने ज्यांचा व्यवसाय किंवा नोकरी सुरक्षेशी संबंधित आहे अशी बहुसंख्य मंडळी अर्थात सैन्यदल, पोलीस, विविध सुरक्षा दलातील अधिकारी व जवान श्री मंगळग्रह देवाला आराध्य दैवत मानतात.
श्री मंगळग्रह देव भूमिपुत्र आहेत. त्यामुळे भारतमातेच्या संरक्षणासाठी असलेले भूमिपुत्र म्हणजेच सैनिक श्री मंगळग्रह देवाला भयमुक्तीची ऊर्जा मानतात. त्यांच्या दर्शनाने त्यांना ऊर्जा प्राप्त होत असून, बळ मिळत असते. यामुळे आजी-माजी सैनिक हे नेहमी येथील श्री मंगळग्रह देवाला मंदिराकडून आजी-माजी जवान व त्यांच्या परिवारास ऋणानुभाव म्हणून आजीवन अभिषेक व महाप्रसाद मोफत दिला जातो. श्री मंगळग्रह मंदिरात चोवीस तास जागता पहारा देण्यासाठी देखील माजी सैनिकच सेवा देत आहेत. त्यामुळे साहजिकच मंदिरात येणाऱ्या भाविकांना सर्वच स्तरावर शिस्तीचे दर्शन घडते.