अमळनेर:- सिने अभिनेता व सीआयडी फेम ऋषिकेश पांडे यांनी मंगळवार दि.२५ एप्रिल रोजी श्री.मंगळग्रह मंदिरात येऊन दर्शन घेतले. मनातील इच्छा,आकांक्षा देवासमोर मांडून ते नतमस्तक झाले. अमळनेर येथील श्री.मंगळग्रह मंदिर हे अति प्राचीन, अति दुर्मिळ आणि अति जागृत देवस्थानांपैकी एक आहे. यामुळे येथे दररोज हजारोंच्या संख्येने भाविक दर्शन व अभिषेकासाठी येत असतात. मंगळवारी सिनेअभिनेता ऋषिकेश पांडे यांनी मंगळग्रह मंदिरावर येऊन देवाचे दर्शन घेतले.
तसेच मंगळवारी होणाऱ्या पालखी उत्सवाचा मानदेखील त्यांना देण्यात आला. यावेळी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. मंदिराचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी ऋषिकेश पांडे यांना मंदिरा बद्दलची संपूर्ण माहिती व महत्त्व विषेद केले. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव यांची उपस्थिती होती.