अमळनेर – मी आतापर्यंत अनेक पर्यटन स्थळ, मंदिरे पाहिली परंतु श्री मंगळग्रह मंदिरासारखे मंदिर वयाच्या साठ वर्षात कधी पाहिले नाही. येथे आल्यानंतर मनाला प्रसन्नता जाणवली असल्याचे उद्गार अमेरिका कॅलिफोर्निया येथील राज्यपाल पदाचे भावी उमेदवार केव्हिन किशोर कौल यांनी मंदिर भेटी प्रसंगी काढले. कौल यांनी नुकतीच श्री. मंगळग्रह मंदिराला भेट देत मंदिराविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतली.ते लॉस एंजेलिस काउंटी शेरीफली बाका यांच्या इंडो- अमेरिकन सल्लागार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही काम करतात. अमेरिकेतील इंडो-अमेरिकन आणि दक्षिण आशियाई अमेरिकन समुदायांच्या सामुदायिक संघटनांचे ते माजी अध्यक्ष देखील आहेत. तथा यूएस ग्लोबल बिझनेस फोरमचे संस्थापक अध्यक्ष म्हणून श्री.कौल दरवर्षी जगातील विविध भागांमध्ये ट्रेड एक्स्पो, इन्व्हेस्टमेंट सेमिनार आणि ग्लोबल व्हेंचर फंडिंग सेमिनार करत आहेत.ते लेफ्टनंट देखील होते. त्यांनी दरवर्षी लॉस एंजेलिसमध्ये आणि भारतात FICCI, यूएस डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स आणि लॉस एंजेलिसचे महापौर यांच्या संयुक्त बॅनरखाली आशिया आणि यूएसएचा द्विपक्षीय गुंतवणूक सेमिनार आणि ट्रेड एक्स्पो २००६ चे आयोजन करण्यात यश मिळवले. तेव्हापासून त्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मसह जागतिक स्तरावर विविध देशांना द्विपक्षीय सेवा देण्यासाठी कधीही मागे वळून पाहिले नाही. ते सध्या मुंबई येथे त्यांच्या एका प्रोजेक्टसाठी आले आहेत. मंदिराविषयी माहिती मिळाल्याने ते दर्शनासाठी आले होते.