देशासह विदेशातूनही भाविक आदल्या दिवसापासून दाखल.
मंगळग्रह मंदिरात मंगळवार दि. १० जानेवारी २०२३ रोजी अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांनी मंगळ ग्रह देवाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती.देशासह विदेशातीलही लाखो भाविक आदल्या दिवसापासूनच मंदिर परिसरात दाखल झाले होते. पहाटे ५ ते ७ यावेळत पंचामृत अभिषेक झाला .मंदिराचा गाभारा पिवळे, लाल झेंडू फुले गुलाबाची फुले आदींनी सजविण्यात आले होते. यासाठी तब्बल एक ते दीड क्विंटल फुले वापरण्यात आली होती.
कडाक्याच्या थंडीत ही भाविकांना दर्शनाची आस अंगारकी चतुर्थीनिमित्त पहाटे पाच वाजेपासूनच भाविकांना मंगळदेवाच्या दर्शनाची आस लागली असल्याचे चित्र मंदिर परिसरात दिसून आले. भाविकांच्या हस्ते पंचामृत महाभिषेक व महाआरतीचा मान जळगाव येथील यजमान दि.वसंतस सुपरशॉपचे संचालक नितीनभाई व सौ. नीलिमा रेदासनी या दाम्पत्यास देण्यात आला होता. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आदी ठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. थंडीत कडाका असताना ही देखील भाविकांची संख्या लक्षणीय होती. लहान बालके सोबत असलेल्या माता व ज्येष्ठ नागरिकांना दर्शनासाठी गैरसोय होऊ नये, याकरिता मंदिर प्रशासनाकडून विशेष दक्षता घेण्यात आली होती.
मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्था
भाविकांची अलोट गर्दी पाहता मंदिरात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेले माजी सैनिक व अमळनेर शहर वाहतूक शाखेच्या
कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती. अंगारकीचा योग पाहता भाविकांसाठी नियमित महाप्रसादासह साबूदाना खिचडी व मिठाईही उपलब्ध करून देण्यात आली होती.