मध्य प्रदेशातील उज्जैन येथील शिक्षिका स्व. नर्मदा लांढे याचे गेल्या वर्षी निधन झाले. निधनापूर्वी त्या अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात दर्शनानिमित्ताने आल्या होत्या. येथील वातावरण व सेवाभावाच्या अनुभूतीने प्रसन्नचित्त झाल्या. त्यानंतर त्यांनी येथे येणाऱ्या दिव्यांग भाविकांची सोय व्हावी, या उद्देशाने नातवाजवळ भाविकांंसाठी व्हीलचेअर दान करण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केली.
स्व. लांढे याचे नातू भारतीय जीवन विमा निगमचे (एलआयसी) प्रतिनिधी दीपक भोळे यानी शुक्रवार, ६ जानेवारी २०२३) रोजी शाकंभरी पौर्णिमेचे औचित्य साधून श्री मंगळग्रह मंदिरासाठी व्हीलचेअर दान केली