अहमदनगर ते अमळनेरपर्यत केला हेलिकॉप्टरने प्रवास
अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरावर ९ रोजी येथे विवाहासाठी आलेल्या नववधूने हेलिकॅप्टर मधून पुष्पवृष्टी करीत मंगळदेवाचे
ज्या भाविकांचा व्यवसाय रेती, माती व शेतीशी निगडीत आहे असे भाविक म्हणजेच बिल्डर, डेव्हलपर,शेतकरी, शेतमजूर,दलाल,सिव्हिल इंजिनिअर,आर्किटेक्ट श्री मंगळग्रहाला अराध्य दैवत मानतात .परिणामी ही सर्व मंडळी मोठ्या श्रध्देने येथील श्री मंगळदेव ग्रहाच्या व भुमीमातेच्या मूर्तीसमोर नतमस्तक होतात. पूजा- अभिषेक करतात .शहरातील प्रसिध्द बिल्डर व डेव्हलपर सरजूशेट गोकलानी व त्यांच्यापरिवाराचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर श्रध्दास्थान आहे. त्यांचा सिव्हिल इंजिनिअर असलेला मुलगा आशिष याचा काही दिवसापुर्वी अहमदनगर येथील सीमरन शी विवाह निश्चित झाला होता . १० रोजी हा विवाह येथे होणार आहे . आज साखरपुडा व हळद आहे . त्यासाठी अहमदनगर येथून हेलिकॉप्टर मधून आलेल्या नववधू सिमरन यांनी मंगळग्रह मंदिरावर पुष्पवृप्टी करुन आशीर्वाद घेतले. त्यानंतर ती विवाहस्थळी गेली .
दरम्यान मंदिरावर पुष्पवृष्टी होणार ही बाब पूर्वनियोजित असल्याने अनेकांना माहित होती . त्यामुळे मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती . अनेक भाविकांनी तर मंदीरावरून जमिनीवर पडलेल्या फुलपाक प्रसादस्वरूप घरी नेल्या .