मंदिर ही एक अशी जागा आहे जिथे आपल्या मनाला शांती मिळत असते. यासाठीच मी अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात पहाटेच्या सुमारास महापूजा केली. यामुळे माझ्यात एक नवीन ऊर्जा संचारल्याची अनुभूती येत असल्याचे मत वेस्टइंडीज येथील भारतीय राजदूत डॉ.के.जे.श्रीनिवासा यांनी व्यक्त केले.
मंगळग्रह सेवा संस्थेच्या मंगळग्रह मंदिरात वेस्टइंडीज येथील भारतीय राजदूत डॉ.के.जे.श्रीनिवासा यांनी सोमवारी पहाटे ५ वजेच्या सुमारास महापूजा केली. पूजेनंतर त्यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, मंदिरात आल्यानंतर आपल्या मनाला शांती मिळत असते. या ठिकाणी मला सरळ पद्धतीने पूजा करून त्याचे महत्त्व देखील गुरुजींनी विषेद करून सांगितले. अशा पद्धतीची पूजा सर्वत्र होत नाही. मात्र मंगळग्रह मंदिर येथे पूजा करून मला नवउर्जा मिळाल्याची अनुभूती येत असल्याचे त्यांनी सांगितले. महापूजेनंतर डॉ. श्रीनिवासा यांच्या हस्ते महाआरती देखील करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ.श्रीनिवासा हे खास महापूजेसाठी वेस्टइंडीज येथून अमळनेर येथे आले होते. मंदिरातील नैसर्गिक वातावरण पाहून ते भारावून गेले होते. मंदिर परिसरात सकारात्मक ऊर्जा अनुभवण्यास मिळत असल्याचेही ते म्हणाले.